सावकार झोकात, कर्जदार कोमात

वाकी- अवैध सावकारकीच्या धंद्याचा कायमचा बिमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल करून, कायदा मंजूर केला आहे. मात्र, स्वःताला मोठे “सावकार’ समजणारे धनदांडगे मनगटशाही, राजकीय वरदहस्त व गुंडगिरीच्या जोरावर व्याजाने पैसे देऊन काहींना वेठीस धरत असून, यातून लाखो रुपयांची माया गोळा करत असल्याचे समोर येत असून चाकण पंचक्रोशीत बेकायदा सावकारकीच्या एकाच महिन्यात दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तर चाकण परिसरात “सावकार झोकात आणि कर्जदार कोमात’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
खेड तालुक्‍यातील चाकण या शहरात मागील पंधरवड्यात व गेल्या काही दिवसांपूर्वी आणखी एक बेकायदा सावकारकीचे प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात स्थानिक विद्यमान नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच काही दिवसांनी आणखी एक प्रकार घडल्याने खासगी सावकरकीचा धंदा छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. चाकण पंचक्रोशीत वाढत्या औद्योगिककरणाने येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. जमिनीतून लाखो, करोडो रुपये आल्याने अनेकांनी गुपचूप अवैध सावकारकी सुरू करून, या परिसरात परप्रांतीयांसह राज्याच्या इतर जिल्ह्यातील अनेक लोकांना काही ठराविक रकमा देऊन व्याजाचा धंदा सुरू ठेवला आहे. गरीबी व अडचणींचा फायदा हे खासगी सावकार घेत असल्याचे अनेक जण खासगीत सांगत आहेत. अवैधपणे सावकारकीचा धंदा करणाऱ्यांनी गरीब व गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा उठवत अनेक खासगी अवैध सावकार 3 टक्के ते 10 टक्के व्याजाने पैसे देत असल्याचा छुपा धंदा मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही जण तर चक्क 20 ते 40 टक्के व्याजानेही पैसे देत आहेत. हे व्याजाचे दर डोळे पांढरे करणारे आहे; परंतु, गरजवंतापुढे पर्याय नसल्यामुळे अनेकजण अवैध सावकारकीचा धंदा करणाऱ्यांकडून पैसे घेत आहेत.
अवैध सावकाराकडून घेतलेल्या रकमेचे व्याजाचे आकडे दिवसेंदिवस फुगत जातो, मग हे पैसे सावकाराला परत करणे कठीण होते. चाकण परिसरातून अनेक जण खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याज दराने घेतलेले पैसे परत करू न शकल्याने कुटुंबासह फरार झाले आहेत. तर अनेक जण कुटूंबाला वाऱ्यावर सोडून परागंदा झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)