सावंत यांची प्रथम श्रेणी लेखापरिक्षकपदी पदोन्नती

अकोले  –अकोले आणि संगमनेर तालुक्‍याच्या सहकाराला शिस्त लावणारे सहकारातील अधिकारी डी. ए. सावंत यांची प्रथमश्रेणी लेखापरिक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. सावंत हे मूळचे वाळवे (जि. सांगली) तालुक्‍याच्या भवानीनगरचे रहिवासी आहेत. त्यांनी संगमनेर आणि अकोले तालुक्‍यात मुख्य शासकीय लेखापरिक्षक म्हणून सेवा केली असून त्यांची कोपरगाव येथे सहकारी संस्थांचे लेखापरिक्षक प्रथम श्रेणी या पदावर पदोन्नती झाली आहे.
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत त्यांनी दोन्ही तालुक्‍यात भरीव आणि वेळेत कामकाज केले. वैद्यनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी त्यांनी सहकारी संस्थामध्ये काटेकोरपणे राबविली. सहकारी संस्थांना वेगळी शिस्त लावणाऱ्या सावंत यांनी सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी यांना कायदे-कानून, पोटनियम यांची सखोल माहिती दिल्याने कामकाज नियमाने होण्यास मदत झाली. या पदोन्नतीबद्दल सावंत यांचे तालुक्‍यातील सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)