सोमाटणे – साळुंब्रे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय व रस्त्यालगत जवळपास 500 विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.

सरपंच उज्ज्वला नंदकुमार आगळे, उपसरपंच दिलीप विधाटे, ग्रामपंचायत सदस्या द्वारका राक्षे, नलिनी विधाटे, वर्षा राक्षे, सगुणा राक्षे, अजय दवणे, समीर थोरवे, मुख्याध्यापिका शोभा महाजन, शिक्षक संतोष सोनवणे, शामराव राक्षे आदीसह ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी झाले होते.

चिंच, बोर, पिंपळ, वड, आंबा, फणस, जांभूळ आदी झाडांची लागवड करण्यात आली. तर सर्व सदस्यांनी यातील प्रत्येकाने पाच झाडे दत्तक घेतली आहेत. त्यामुळे या वृक्षांची अधिक काळजी घेतली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)