साळवाडीत पशुआरोग्य शिबिरात 1159 जनावरांची तपासणी

आळेफाटा- साळवाडी (ता. जुन्नर) येथे पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र सरकार आणि ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत पशुआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिरात 1 हजार 159 जनावरांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आल्याची माहिती सरपंच ज्ञानेश्वर शेटे आणि ग्रामसेविका अश्विनी लेंडे यांनी दिली. पशु वैद्यकीय दवाखाना बोरी श्रेणी 2 यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आणि चारंगेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्‌घाटन शिवसेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, शिवसेना तालुका उपाध्यक्ष मंगेश काकडे, सरपंच ज्ञानेश्वर शेटे, तंटामुक्ती अध्यक्ष सुदाम काळे, ग्रामसेविका आश्विनी लेंडे व पशुपालक उपस्थित होते. शिबिरामधे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्जेराव साळुंखे, डॉ.अनिल भगत,डॉ. विष्णू आंधळे,डॉ. बाळासाहेब लबडे, डॉ. मंगेश खिल्लारी, डॉ. सुभाष बढे, डॉ. रोहन दाते, डॉ. अजिंक्‍य दाते आणि डॉ.अक्षय काळे आदी डॉक्‍टर सहभागी झाले होते. यावेळी जनावरांचे वंध्यत्व, गर्भधारणा आणि इतर तपासणी करून गोचिड, जंत निर्मूलनासाठी मोफत औषधे देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)