सालपेनजीक रेल्वेवर दरोडा

दगडफेक करत प्रवाशांना लुटले
लोणंद- पुणे-मिरज रेल्वे मार्गावर लोणंद रेल्वे स्टेशन जवळील तांबवे ते सालपेदरम्यान अज्ञातांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन रेल्वेवर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी रेल्वेवर दगडफेक करत प्रवाशांची लूट केली व फरार झाले. ही घटना रविवारी पहाटेच्यावेळी घडली. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

पुणे-मिरज रेल्वे मार्गावरुन प्रवास करणारी दादर ते हुबळी ही रेल्वे रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लोणंद रेल्वेस्टेशनपासून सात किलोमीटर अंतरावर तांबवे ते सालपे दरम्यान आली असताना अज्ञात दरोडेखोरांनी सिंग्नल यंत्रणेत बिघाड करुन ही रेल्वे थांबवली. त्यानंतर या दरोडेखोरांनी रेल्वेवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दगडफेकीनंतर अज्ञातांनी रेल्वेत घुसून प्रवाशांची लूट केली.

पुणे-मिरज रेल्वे मार्गावरुन प्रवास करणारी दादर ते हुबळी ही रेल्वे रविवारी पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी लोणंद रेल्वेस्थानकातून सापलेकडे मार्गस्थ झाली. परंतु, दरोडेखोरांनी होम सिग्नलचा बॉक्‍स व वायर तोडल्याने रेल्वे चालकाला सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे चालकाला सालपे रेल्व स्टेशनच्या अलिकडे थांबवावी लागली. यादरम्यानच हा दरोड्याचा प्रकार घडला. दादर ते हुबळी रेल्वेला सिग्नल मिळाला नसल्याने ती थांबली असल्याचे लक्षात आल्याने पाठीमागून येणारी महालक्ष्मी एक्‍सप्रेस देखील काही काळ थांबवण्यात आली व नीरा येथील पथक बोलावून दुरूस्तीचे काम पुर्ण झाल्यावरच गाडी पुढे मार्गस्थ झाली. सातारा येथील लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अज्ञातांनी टाकलेल्या दरोड्यात प्रवाशांकडील दागिन्यांची तसेच लॅपटॉप चोरी केल्याचे समजते. याप्रकरणी लोणंद रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, सातारा येथील लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

पुणे ते मिरज रेल्वे लोणंद पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सालपे स्टेशनच्या जवळ तांबवे ते सालपे दरम्यान रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दादर ते हुबळी गाडी सिग्नल यंत्रणेत बिघाड करून थांबवण्यात आली. त्यानंतर गाडीवर दगडफेक करून लुटालूट केल्याची चर्चा आहे. या प्रकाराची अधिकृतरित्या काहीही माहिती मिळाली नाही. तसेच या परिसरात लोकवस्ती नसल्याने वारंवार असे प्रकार घडतात त्यामुळे झाल्या प्रकाराने रेल्वे प्रवाशांत घबराट पसरली आहे.
पुणे – मिरज लोहमार्गावरील लोणंद पासून सात किलोमीटर अंतरावरील सालपे रेल्वे स्थानकाजवळ सालपे ते तांबवे गावादरम्यान रविवारी पहाटे अडीच सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी होम सिग्नल बॉक्‍स व त्याची वायर तोडली. सिग्नल न मिळाल्याने दादर-हुबळी ही रेल्वे थांबल्यानंतर तिच्यावर दगडफेक करुन काही प्रवाशांची लुटमार करून दरोडा टाकल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. लोणंद येथून पहाटे दोन वाजुन पाच मिनिटांनी दादर हुबळी रेल्वे स्थानकातुन सालपे कडे मार्गस्थ झाली. परंतु होम सिग्नल चा बॉक्‍स व वायर अज्ञात दरोडेखोरांनी तोडली असल्याने सालपे स्टेशनच्या अलीकडे सिग्नल न मिळाल्याने चालकाला रेल्वे थांबवावी लागली. याचाच फायदा घेत दरोडेखोरांनी रेल्वेवर दगडफेक करून दहशत निर्माण करून डब्यात प्रवेश केला आणि लुटालूट केली. परंतु सदर घटनेला सालपे व लोणंद रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दुजोरा मिळू शकला नाही.

दादर ते हुबळी रेल्वेला सिग्नल मिळाला नसल्याने ती थांबली असल्याचे लक्षात आल्याने पाठीमागून येणारी महालक्ष्मी एक्‍सप्रेस देखील काही काळ थांबवण्यात आली. व नीरा येथील पथक बोलावून दुरूस्तीचे काम पुर्ण झाल्यावरच गाडी पुढे मार्गस्थ झाली. सातारा येथील लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)