सालगाव शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

मंचर- सालगाव (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत 71 विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह शिक्षक उपस्थित होते. सालगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 71 विद्यार्थ्यांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सालगावचे ग्रामस्थ मधुकर केशव गव्हाणे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सलग चौथ्या वर्षी विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सालगाव धर्मादाय निधी मंडळाचे अध्यक्ष बबनराव गव्हाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वजीत गव्हाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक भवारी यांनी केले, तर सूत्रसंचालन मुख्याध्यापिका शैला शिंगाडे यांनी केले. काशिनाथ घोंगडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाची व्यवस्था दत्तात्रय मेचकर यांनी पाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)