सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपकडून लॉलीपॉप : शिवसेना 

मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्‌द्‌यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा मित्रपक्ष भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. राम मंदिर उभारण्याची मागणी असताना उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने मात्र पुतळा दिला आणि फैजाबादचे नामकरण केले. सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपकडून देण्यात आलेला तो लॉलीपॉप आहे, अशी खिल्ली शिवसेनेने उडवली आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली. याशिवाय, त्यांनी फैजाबादचे नामकरण अयोध्या असे केले. त्याचा समाचार शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून घेतला आहे. सरकार बहुतेक सर्वच पातळ्यांवर नालायक ठरल्याने पुन्हा अयोध्येचा विषय हाती घेऊन लोकांना भ्रमित करण्याचे ठरलेले दिसते, अशी टिप्पणी अग्रलेखात करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)