सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी एकाला अटक

पिंपरी – सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करुन येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करत सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग केल्या प्रकरणी पोलीसांनी एका तरुणाला अटक करण्यात केली. ही घटना गुरुवारी (दि.29) सायंकाळी भोसरीत घडली.

गौसुद्दीन रजाक अत्तार (वय 20, रा. बालाजी नगर झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव याप्रकरणी भाऊसाहेब पाटील (वय 35, रा. भोसरी, पुणे) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौसुद्दीन रजाक अत्तार गुरुवारी सायंकाळी हॉटेल थर्माईस जवळ दारू पिऊन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करीत होता. यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होता होता. यामुळेएखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून भाऊसाहेब पाटील यांनी भोसरी एमआयडीसी पोलीसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीसांनी गौसुद्दीन याला तात्काळ अटक केली. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)