सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शासन देणार बाजरी, ज्वारी

नवी दिल्ली : गरीब नागरिकांची पोषण सुरक्षा सुधारण्यासाठी केंद्र शासन आता ज्वारी आणि बाजरी हे ही धान्ये सार्वजनिक वितरण प्रणालीच्या (स्वस्त धान्य दुकान) माध्यमातून वितरीत करणार आहे, याबाबतचा विचार अंतिम टप्प्यात आहे.

अन्न कायद्यानुसार, शासन सध्या स्वस्त धान्य दुकानांतून मोठ्या प्रमाणात अनुदान देत गहू आणि ज्वारीची १-३ रु./किलो या भावाने विक्री करते.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बाजरीमध्ये देशभरातील नागरिकांना शाश्वतता तसेच अन्न आणि पोषक घटक पुरवण्याची मोठ्या प्रमाणात क्षमता आहे. याशिवाय हे धान्य म्हणजे फक्त उर्जेचे स्रोत नव्हेत, तर वातावरणाशी जुळवून घेणारी पिके आहेत. याशिवाय महत्वाची पोषक गुणधर्म या धान्यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)