सार्वजनिक वाहतूक ‘स्मार्ट’ कधी होणार?

File photo...

चिंचवड – शहराचा स्मार्ट सिटीच्या दृष्टीकोनातून विकास सुरू असताना सार्वजनिक वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे. शहराबरोबर वाहतूक व्यवस्थाही स्मार्ट व्हायला हवी, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आली.

याबाबत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नुकतेच चिंचवड येथे मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, संघाचे मुकेश चुडासमा, निर्मला माने, शरद चव्हाण, नंदु भोगले आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे महापालिकेची लोकसंख्या 38 लाख व पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखाच्या आसपास झाली आहे. औद्योगिकरणामुळे देशभरातील तरूणाचा ओढा दिवसेंदिवस नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने दोन्ही शहरात वाढतच आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला आय.एस.ओ. 9001-2008 साली हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या शहराची स्मार्ट सिटी प्रकल्प उपक्रमाकरीता निवड झाली आहे. रस्ते वाहतुकीकरिता निगडी येथून पी.एम.पी.एम.एल. ने दररोज 2 लाख 80 हजार प्रवासी पुणे शहरात सरकारी, निमसरकारी, कार्यालये, शाळा, कॉलेज, व्यवसायानिमित्त ये-जा करीत आहे. रस्ते मार्गाला समांतर असलेले पुणे-लोणावळा मार्गावर चार युनिट लोकल दिवसभरात 42 दुतर्फा धावत असून दररोज 1 लाख 30 प्रवासी लोकलने प्रवास करीत आहे.

आकुर्डी ते पुणे 5 ते 6 रूपये तिकीट दर आहे. पी.एम.पी.एल. चे निगडी ते स्वारगेटपर्यंत 35 रूपये तिकीट दर आहे. या शहरात कष्टकरी, गरीब, अल्पउत्पन्न गटातील नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 60 टक्केच्या आसपास आहे. रस्ते मार्गाने होणारी पीएमपीएमएलची सेवा व रेल्वे मार्गावरील लोकल प्रवासी सेवा अत्यल्प व अपुरी असल्याकारणाने नागरिकांनी दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी केली.

दोन्ही शहरात अंदाजे 44 लाखांहून अधिक सर्व प्रकारचे वाहने उपलब्ध आहेत. त्याचे प्रमुख कारण दोन्ही महापालिकेच्या राज्यकर्त्यांनी शहर विकासाचा नियोजनाकडे हव्या त्या प्रमाणात वेळो-वेळी योग्य निर्णय घेतले नाही. असे चित्र असतानाच सन 2006 साली केंद्र सरकार, राज्य शासन व दोन्ही महापालिकांनी संयुक्तपणे मेट्रो प्रकल्प राबविण्याची घोषणा केली. मात्र, निगडीऐवजी पिंपरीपर्यंतच मेट्रोचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही बाब अन्यायकारक आहे. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो नेण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)