सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा

पुणे : पार्किंग पॉलिसीला कॉंग्रेसचा विरोध नाही. उलट 2010 मध्ये आम्ही सत्तेत असताना पार्किंग पॉलिसी आणली होती. परंतू त्यावेळी दुचाकी चालकांना भुर्दंड नको, म्हणून भाजपने तथा विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांनीच विरोध केला होता. आताही स्थायी समिती अध्यक्ष आणि समितीतील आठ सदस्य नवीन असताना एक महिना पुढे ढकललेला प्रस्ताव अचानक बैठकीत आणून उपसूचनेद्वारे मंजूर करण्यात आला.

भाजप सातत्याने रंग बदलणारा पक्ष असून, पुणेकरांची फसवणूक केली जात आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असून, नागरिकांनी त्याचा अधिक वापर केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)