सार्वजनिक प्रकल्पांसाठी पीएमआरडीएला मिळणार गायरान जागा

जमीन वाटपाचे अधिकार पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना

पुणे- सार्वजनिक हेतूसाठी अथवा सार्वजनिक प्रकल्पांसाठी आवश्‍यकता भासल्यास गायरान जमिनी वाटपाचे अधिकार राज्य सरकारने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत असलेल्या गायरान जमिनी प्राधिकरणाला विविध पायाभूत सुविधा उभारण्यासाठी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा आहे.

पुणे महानगर क्षेत्राचा विकास गतीने व्हावा, यासाठी राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी प्राधिकरणाची स्थापना केली. त्यानंतर प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व ऍमेनिटी स्पेपच्या जागा प्राधिकरणाकडे विविध पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून वर्ग करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त प्राधिकरणाच्या हद्दीतील गायरान जमिनीही उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पीएमआरडीएने केली होती.

पीएमआरडीएकडून रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 123 किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड आहे. या रिंगरोडसाठी टीपी स्कीम हे मॉडेल राबविले जाणार आहे. या रिंगरोडभोवती सुमारे 1200 हेक्‍टर इतकी जमीन ही शासनाच्या मालकीची आहे. या जमिनी मिळाव्यात, यासाठी प्राधिकरणाने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला आहे.

सार्वजनिक प्रकल्पांसाठी गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याचे अधिकार यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना होते. मध्यंतरी राज्य सरकारने हे अधिकार काढून घेत स्वत:कडे घेतले होते. त्यामुळे शासकीय जागा अथवा गायरान जागा अशा प्रकल्पांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागत असे. त्यास होणार विलंब आणि त्यामुळे वाढणार खर्च पाहता अनेक प्रकल्पांचे कामे अडकून पडली आहेत. त्यामुळे हे अधिकार पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी होत होती.

दरम्यान सरकारने जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीत बदल करून अशा जमिनी उपलब्ध करून देण्याचे अधिकार पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे विविध पायाभूत प्रकल्प अथवा शासकीय संस्थांना प्रकल्प राबविण्यासाठी गायरान जागा उपलब्ध करून देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना मिळाल्यामुळे ही कामे वेगाने मार्गी लागण्यात मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)