सार्वजनिक पार्किंग पॉलिसी करा

  • महापौरांच्या सूचना ः वाहतुक कोंडीवर उपाय शोधणार

पिंपरी,  (प्रतिनिधी) – शहरातील बाजारपेठा, मुख्य रस्ते, गजबजलेल्या ठिकाणी रस्त्यावरच बेकायदेशीर वाहने पार्क केली जातात. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची यातून सुटका करण्यासाठी तसेच, वाहनचालकांना वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी सार्वजनिक पार्किंग पॉलिसी तयार करण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पुणे महापालिकेने सार्वजनिक पार्किंग धोरण तयार केले, त्याला मान्यता मिळाली आहे. परंतु, या धोरणाला विरोधकांनी विरोध केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांची वाढती संख्या, वाहतूक नियमांचे पालन न करण्याची वाढती प्रवृत्ती आणि शहराचा वाढता परिसर पाहता पार्किंग झोन नाही. त्याचप्रमाणे महापालिका, वाहतूक पोलीस, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध भागात पार्किंगची समस्या वाढतच आहे. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

पार्किंग पॉलिसीबाबत विचारले असता महापौर नितीन काळजे म्हणाले की, शहरात मोठ-मोठे रस्ते आहेत. परंतु, नागरिक रस्त्यावरच वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहनचालकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. शहरात पार्किंगची समस्या आहे. रस्त्यांवरील पार्किंगची समस्या मोठी आहे. पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे पे ऍन्ड पार्किंगचे धोरण तयार करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती महापौर काळजे यांनी सांगितली.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पालिकेने पार्किंग पॉलिसी तयार केली आहे. लवकरच महासभेची मान्यता घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)