सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

पुणे – स्वच्छ सर्वेक्षण अभियान-2019 च्या अनुषंगाने आता फेरीवाले, रस्त्यावरच खाद्यपदार्थ शिजवणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी हे आदेश काढले आहेत.

सार्वजनिक रस्ता पदपथांवर बहुतांश ठिकाणी हे फेरीवाले रस्त्यावर खाद्यपदार्थ शिजवणे, गॅस सिलेंडर वापरणे, कचऱ्याची बकेट न ठेवणे, शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ सार्वजनिक जागेत टाकणे, परवाना प्रमाणपत्रधारक व्यावसायिक स्वत: व्यवसाय करत नाहीत अशांवर ही कारवाई होणार आहे. नियमांचा भंग करून व्यवसाय केले जात असल्यामुळे संपूर्ण शहरात ही कारवाई केली जाणार आहे.

-Ads-

शहरातील रस्त्यांवर टेम्पोमध्ये व्यवसाय करणाऱ्यांवर दर आठवड्यातील एक दिवस सर्व परिमंडळ हद्दीत वाहतूक पोलीस विभागासह संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. हॉकर्स पुनर्वसनासाठी निश्‍चित केलेल्या “हॉकर्स झोन’ व्यतिरिक्त व्यवसाय करणाऱ्या सर्व फेरीवाल्या व्यावसायिकांवर दर आठवड्यातील एक दिवस संयुक्तपणे कारवाई करणे. अंडाभुर्जी, चायनीज विक्रेते यांच्यावर आरोग्य विभाग आणि अतिक्रमण विभाग यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करणे, अनधिकृत गॅससिलेंडर, स्टोव्ह असे ज्वलनशील पदार्थ वापरून रस्त्यांवर विक्री करणाऱ्या पथविक्रेत्यांवर, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे, कचऱ्यासाठी बकेट न ठेवणे, महापालिका अतिक्रमण विभाग परवाना अशा व्यावसायिकांवरही कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)