सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांप्रमाणे सहकारी बॅंकांना मदतीची गरज : शरद पवार

मुंबई: राष्ट्रीयकृत बॅंका जेव्हा अडचणीत आल्या तेव्हा केंद्र सरकारने 86 हजार कोटी रुपयांची मदत त्यांना केली, पण सहकार क्षेत्रातील बॅंक किंवा दुसरी संस्था अडचणीत आली की तिच्यावर चौकशीची, बरखास्तीची कारवाई केली जाते. सहकार क्षेत्रातील संस्था या सामान्य माणसाला मदत करत असतात, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांच्याबाबतीतही मदतीची भूमिका घ्यायला हवी असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. सारस्वत सहकारी बॅंकेचा शतकपूर्ती समारंभात ते बोलत होते. या समारंभाला सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, व्यवस्थापकीय संचालक स्मिता संधाने, संचालक पद्मर्शी मधू मंगेश कर्णिक उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, द्रष्ट्या नेत्यांनी घातलेल्या पायामुळेच देशभरातील एकूण सहकारी बॅंकांपैकी 70 टक्के बॅंका महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या तीन राज्यांमध्ये आहेत. गौतम ठाकूर म्हणाले की, शंभर वर्षांपूर्वी सारस्वत समाजाच्या आर्थिक गरज भागवण्यासाठी क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. आज सारस्वत बॅंक आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बॅंक झाली आहे. अनेक बॅंका बुडीत कर्जाच्या समस्येने त्रस्त आहेत. पण त्याचवेळी सारस्वत बॅंकेने त्याचे प्रमाण शून्य टक्‍क्‍यांपर्यंत ठेवल्याबद्दल समाधान वाटत आहे. पुढील 100 वर्षांत सारस्वत बॅंक जगातील आघाडीची सहकारी बॅंक व्हावी हेच आमचे स्वप्न आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)