सार्वजनिक अशुध्दलेखन

वयाच्या पाचव्या वर्षापासून आणि इयत्ता पहिलीपासून जरी मराठी भाषा शिकवली जात असली तरी समाजात आसपास दिसणारे सार्वजनिक अशुध्दलेखन पाहता आपण खरोखरच मराठी शिकलो का आणि शिक्षकांनी खरोखरच मराठी शिकवले का हाच प्रश्‍न पडतो. या सार्वजनिक अशुध्दलेखनामुळे व्यवहारात जरी काहीच फरक पडत नसला तरी आणि अर्थही बदलत नसला तरी हे सार्वजनिक अशुध्दलेखन डोळ्यांना खटकते.

सातारा शहरात राधिका रोडवर एक थंड पेये विकणारा गाडा आहे. या गाडीवर फ्रूट सॅलडही विकले जाते. पण या फ्रूट सॅलडची जाहीरात फ्रूड सॅलट अशी करण्यात आली आहे. फ्रूटमधील ट आणि सॅलडमधील ड यांची अदलाबदल होउन एक वेगळाच गमतीदार शब्द तयार झाला आहे.मटण आणि चिकन विकणाऱ्या दुकांनाच्या बाहेरही मटन आणि चिकण असे लिहून ण आणि नची अदलाबदल केलेली दिसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा शहरातच एक केशकर्तनालयावरील पाटीमध्ये जेंटस पार्लर हे शब्द इंग्रजीमध्ये लिहीताना जेंटसचे स्पेलिंग जीऐवजी जे या अक्षराने सुरु केलेले आढळते. अनेक सरकारी कार्यालये आणि बॅंकांमध्येही सूचना फलकावर असेच अशुध्दलेखन असते.प्रमाण मराठीचा आग्रह आता सर्वानीच सोडून दिला असला तरी किमान डोळ्यांना न खटकणारे आणि चेष्ट न होणारे तिसरा डोळा सार्वजनिक शुध्दलेखन असावे अशी अपेक्षा करायला हरकत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)