सार्क संघटनेची परिषद तातडीने बोलवा ; नेपाळची सुचना

 जर ट्रम्प आणि किम जोंग एकत्र येऊ शकतात तर आपण का नाही?

नवी दिल्ली- दक्षिण अशियाई सहकार परिषद म्हणजेच सार्क संघटनेची बैठक गेल्या अनेक दिवसांत झालेली नाही. ती बैठक त्वरीत बोलवावी अशी मागणी नेपाळने केली आहे. नेपाळचे विदेश मंत्री प्रदीपकुमार ग्यावली यांनी म्हटले आहे की जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कट्टर विरोधक उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग हे जर आपसातले मतभेद मिटवण्यासाठी एकत्र येऊ शकतात तर आपण सार्कचे देश एकत्र का येऊ शकत नाही असा सवाल त्यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपसातील मतभेद मिटवण्यासाठी एकत्र येऊन चर्चा करणे हाच एक उपाय आहे असे ते म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वादामुळे गेल्या अनेक दिवसांत सार्क परिषद होऊ शकलेली नाही. नेपाळचे विदेश मंत्री म्हणाले की आज साऱ्या जगापुढे दहशतवाद आणि वातावरणातील बदल हे महत्वाचे विषय आहेत. त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे सार्कची परिषद लवकरात लवकर बोलवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)