“सारे जहॉं से अच्छा’मध्ये झळकणार शाहरुख

बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपटांची चलती आहे. क्रीडापटू, राजकरणी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांच्या जीवनावर आधारित एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे. या चित्रपटात किंग खान अर्थात शाहरुख खान झळकणार आहे.

“सारे जहॉं से अच्छा’ असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिका साकारणार आहे. येत्या फेब्रुवारीत चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. मे किंवा जूनमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. पण किंग खानने झिरो चित्रपटाच्या अपयशानंतर यातून बाहेर येण्यासाठी स्वतःला व्यग्र करुन घेण्यासाठी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला फेब्रुवारीतच सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अभिनेत्री भूमी पेडणेकर या चित्रपटात राकेश शर्मा यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुख खान, रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)