‘सारे जहाँ से अच्छा’मध्ये शाहरुखऐवजी विक्की कौशल? 

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित ‘सारे जहाँ से अच्छा’ चित्रपटातून आमिरपाठोपाठ शाहरुखनेही एक्झिट घेतली आहे. शाहरुख खानने हा चित्रपट का सोडला याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे राकेश शर्मा यांच्या भूमिकेसाठी विक्की कौशलचे नाव पुढे येत आहे.

विकी कौशलचा ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमवत आहे. यामुळे शाहरुख खानला विक्की कौशल रिप्लेस करण्याची शक्यता अधिक आहे. परंतु, यावर निर्मात्यांनीही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे विक्की कौशलबाबतही संभ्रम कायम आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर करणार आहेत. तर दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)