‘सारा’ बॉलिवूडमध्ये प्रभाव दाखवेल, आई करिनाचा विश्‍वास

सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ती बॉलिवूडमध्ये आपला प्रभाव दाखवेल असा विश्वास आई करिना कपूर खानने दाखवला आहे. याबद्दल करिना एका इव्हेन्टमध्ये बोलत होती.

ऋजूता दिवेकर यांचे गरोदरपणावरचे पुस्तक प्रकाशनाच्यावेळी करिना बोलत होती. सैफची मुलगी साराला करिना काही टिप्स देते का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. “तिला कोणत्याही टिप्सची जरुरत नाही. तिच्या रगारगात अभिनय भरला आहे. सौंदर्य आणि प्रतिभेच्या जोरावर ती फिल्म इंडस्ट्रीत धमाल उडवून देईल,” असे करिना म्हणाली.

अभिषेक कपूर दिग्दर्शन करीत असलेल्या ‘केदारनाथ’ या चित्रपटातून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटात सुशांत सिंग रजपूतसोबत तिची जोडी आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)