“सारा पास’ शिखरावर फडकविला सह्याद्रीचा भगवा!

गिर्यारोहकांची कामगिरी : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 18 जणांचा समावेश

पिंपरी – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 18 गिर्यारोहकांनी एकत्रित येत हिमाचल प्रदेशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या “सारा पास’ शिखरावर यशस्वी चढाई केली. बर्फाळ प्रदेश आणि धोकादायक डोंगर रांगेतून खडतर प्रवास करून त्यांनी या शिखरावर सह्याद्रीचा भगवा ध्वज फडकवला.

दि. 13 ते 20 मे 2018 या आठ दिवसांच्या कालावधीत या तरुणांनी ही मोहीम पूर्ण केली. हिमाचल प्रदेशातील बर्फाळ डोंगररांगा असलेला कठीण हा परिसर आहे. या मोहिमेत 23 ते 63 वर्षे वयोगटातील गिर्यारोहकांचा समावेश होता. या मोहिमेचे नेतृत्व पारुल मोटा यांनी केले. तर, सुशील दुधाने, सुनील ताम्हाणे, विनोद मेहता, नाथा राणे, दीपक कोलगावकर, निकिता शाह, मिलिंद तुपे -जयंत तुपे -कोमल राजपाठक, क्षीपा गोखले, नीरजा गोखले, अंकुर परासर, रोहन व शिवानी गोरे, जितेंद्र आगरवाल, हेमा आगरवाल हे सहभागी झाले होते.

मोहिमेविषयी माहिती देताना सुशील दुधाने म्हणाले, या मोहिमेसाठी 13 मे रोजी आम्ही पुण्यापासून निघालो. 15 मे रोजी कसोल या बेस कॅम्पच्या ठिकाणी पोहचून 16 मे रोजी कसोल (1526 मीटर 5005 फूट ) येथून ट्रेकला सुरुवात केली. 17 मे रोजी सकाळी आठ वाजता ग्रहण येथून ट्रेकला सुरुवात केली. 18 मे ला सकाळी नऊ वाजता आम्ही मीन थास येथून ट्रेकला सुरुवात केली. 19 मे ला पहाटे साडेपाच वाजता आम्ही सार पासच्या दिशेने निघालो. बर्फावरुन चालताना नाकीनऊ आले होते. परंतु, धडपडत या संकटांवर मात करीत ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला होता. त्या सारा पास शिखरावर (4208 मीटर 13475 फुट दीड किलोमीटर पार करुन झाल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता पाऊल ठेवले. तेथे एकच जल्लोष करत शिवाजी महराज की, जय जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव या घोषणा देऊन भगवा ध्वज माथ्यावर फडकावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)