सारा खानचा बाथटबमधील व्हिडीओ व्हायरल

सिनेसृष्टीमध्ये दररोज काहीना काही गोष्टी व्हायरल होतच असतात. मात्र अनवधानाने व्हायरल झालेल्या एखाद्या फोटो किंवा व्हिडीओमुळे कोणीतरी खूप मोठ्या अडचणीत येऊ शकते. असाच एक प्रकार मंगळवारी सारा खानच्याबाबतीत घडला. सारा बाथटबमध्ये अंघोळ करत असतानाचा व्हिडीओ अचानक व्हायरल झाला आणि त्याची सोशल मिडीयावर अनावश्‍यक चर्चाही झाली. साराने असा व्हिडीओ कसा काय व्हायरल केला, असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला. तिच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात होण्यापूर्वीच ही आपत्ती आली आहे.

यथावकाश या सगळ्या गोंधळाचे मूळ कारणही उलगडले आहे. साराची बहिण आर्याकडून हा व्हिडीओ चक्क नशेच्या अंमलाखाली व्हायरल झाला होता. स्वतःच्या बहिणीच्या चुकीबद्दल सारानेच सावरासावर केली आहे. आर्याने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना तिला याच्या परिणामांची जराशीही जाणीव नसावी. तिच्याकडून हा व्हिडीओ शेअर झाल्यावर लगेचच तिला ही जाणीव झाली आणि तिने लगेचच व्हिडीओ डीलीट केला होता. मात्र त्या काही सेकंदांमध्ये हा व्हिडीओ हजारो लोकांपर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता व्हिडीओ आपल्या निकटवर्तीयांमध्ये शेअर केला आणि घडायचा तो गोंधळ घडून गेला. या व्हिडीओचे स्क्रीनशॉट घेऊन ते देखील व्हायरल झाले होते. आता ते व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ रोखणे कोणाच्याही हातामध्ये राहिलेले नव्हते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साराने दुसऱ्या दिवशी एक इंटरव्ह्यू देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आर्याने हा व्हिडीओ केवळ मौजमस्तीमध्ये बनवला होता. आमची चेष्टा मस्करी चालली होती. त्यावेळी आर्या थोडी “प्यायलेली’ होती. तिने व्हिडीओ डिलीटही केला होता. पण चूक ती चूकच आहे. त्याबाबत आता स्पष्टिकरण देऊन उपयोग काय! आजचे जग खूपच फास्ट झाले आहे. टेक्‍नोलॉजीशी खेळणे खूपच महागात पडू शकते, असेच आपण म्हणू शकतो. आर्याला ही बाब कधी समजेल माहित नाही. पण या उदाहरणावरून इतरांनी तरी धडा घ्यावा हे निश्‍चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)