सारा अली खान लवकरच सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह होणार ? 

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान ही बॉलीवुडमध्ये येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून ती सतत चर्चेत आहे. ती “केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिका साकारणार असून हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होउ शकतो. याशिवाय ती रणवीर सिंह सोबत रोहित शेट्‌टीच्या “सिंबा’ चित्रपटातही झळकणार आहे.
सारा अली खानबाबत जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सूक आहेत. यासाठी ती सोशल मिडीयावर केव्हा ऍक्‍टिव्ह होणार याची ते वाट पाहत आहेत. तसेच साराच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला देशभरातील तिचे चाहते सोशल मीडियावर तिला शुभेच्छा देत आहे. याशिवाय ट्‌विटरवर #SaraAliKhanOnSocialMedia चा ट्रेंड सुरू आहे.
दरम्यान, साराच्या पहिल्या चित्रपटाची सोशल मीडियावर खूपच चर्चा होत आहे. यामुळे साराचा परफॉर्मेंस सिल्वर स्क्रीनवर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्साहित आहेत. यापूर्वी चर्चा होती की करण जोहरच्या “स्टूडेंट ऑफ द इयर 2’मधून ती बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. परंतु तिने हा चित्रपट नाकारला आहे. आता या चित्रपटात चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया काम करणार आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)