सारा अली खानचे पदार्पण सिंबातून नाही, केदारनाथमधून 

सैफ अली खानची कन्या सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या “केदारनाथ’च्या रिलीज डेटबाबत सातत्याने गोंधळाचे वातावरण राहिले आहे. त्यामुळे साराचा पदार्पणाचा सिनेमा “केदारनाथ’ असेल की “सिंबा’ याचा उलगडा होऊ शकलेले नव्हते. पण आता “केदारनाथ’हाच साराचा पदार्पणाचा सिनेमा असेल, हे स्पष्ट झाले आहे. साराने आपल्या इन्स्टाग्रामवर “केदारनाथ’चे नवीन पोस्टर नुकतेच पोस्ट केले आहे. त्यामध्ये सारा आणि हिरो सुशांत सिंह रजपूत पहिल्यांदाच एकत्र दिसत आहेत.

साराला पाठीवर घेऊन सुशांत डोंगरी वाट चालताना दिसतो आहे. “केदारनाथ’ 7 डिसेंबरला रिलीज होईल, असे या पोस्टरवरच्या तारखेवरून समजते आहे. निर्मात्यांच्या आपापसातील वादविवादामुळे सिनेमाची रिलीजची तारीख सारखी बदलली जात होती. “नो ट्रॅजेडी, नो व्रॅथ ऑफ नेचर, नो ऍक्‍ट ऑफ गॉड कॅन डिफीट द पॉवर ऑफ लव्ह’ अशी कॅप्शन साराने या पोस्टरच्या पोस्टला दिली आहे. “सिंबा’मध्ये तिच्याबरोबर रणवीर सिंह असणार आहे. तमिळमध्ये सुपरहिट ठरलेल्या “टेंपर’चा मुक्‍त हिंदी रिमेक म्हणजेच”सिंबा’ असणार आहे. अजून “सिंबा’च्या रिलीजबाबत काहीच चर्चा नाही. म्हणजे “केदारनाथ’च साराचा डेब्यू ठरणार आहे, असे समजूया.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)