सारा अली खानचा व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलीवूडमधील अभिनेता सैफ अली खान आणि त्यांची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. तिचा पहिला चित्रपट “केदारनाथ’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत असणार आहे. तर तिचा दुसरा चित्रपट हा रोहित शेट्टी दिग्दर्शित “सिम्बा’ असणार आहे. त्यामध्ये आपणाला तिच्यासोबत रणवीर सिंग दिसेल.

सारा अली खान ही शनिवारी जुहू येथील शनी मंदिरात भाऊ इब्राहीम खान सोबत पोहचली. त्यानंतर तेथे पत्रकारांची एकच गर्दी जमा झाली. दर्शनानंतर ती तेथे दान करत होती. त्यावेळी तेथे जमा झालेले कॅमेरामन व्हिडिओ काढत होते. त्यामुळे सारा भडकली आणि त्यांना व्हिडिओ काढण्यास मनाई केली. त्यानंतर दान करून ती निघून गेली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

तिचा पहिला चित्रपट “केदारनाथ’ हा 30 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. तर रोहित शेट्टीचा “सिम्बा’ हा चित्रपट 28 डिसेंबरला प्रदर्शित होऊ शकतो. “सिम्बा’ हा साऊथमधील सुपरहीट चित्रपट “टेम्पर’चा रिमेक आहे.

At #Juhu Temple today with brother. #SaraAliKhan

A post shared by Sara Ali Khan (@sakhanofficial) on


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)