साराची आई होणे शक्‍य नाही – करीना

‘बेबो’, ‘बेगमजान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूर खान हिने नेहमीच विविध विषयांवर तिची ठाम भूमिका मांडली आहे. एखाद्या कलाकाराला पाठिंबा देणे असो किंवा मग पतीच्या पूर्वायुष्याविषयी वक्‍तव्य करणे असो. करीनाने नेहमीच या सर्व गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले आहे.

करीना ही तुझी सावत्रआई आहे. तर तू तिला “छोटी आई’ बोल, असे सैफने साराला सांगितले होते. पण “छोटी मम्मी’ ऐकून करीनाला खूप राग आला. तिने साराला करीना अशीच नावाने हाक मारायला सांगितले होते, असे सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुलगी साराने नुकतेच सांगितले.

-Ads-

सारा आणि इब्राहिम यांना ऑलरेडी खूप छान आई आहे. त्यांनी दोघांचे चांगल पालनपोषण केले आहे. अशा स्थितीत मी त्यांच्या आईचा हक्क घेऊ इच्छित नाही, असे करीनाने म्हटले आहे. तसेच मी दोघांची चांगली फ्रेंड म्हणून राहू शकते. तसेच त्यांना जेव्हा गरज असले तेव्हा मी धावून जाईल, असेही करीनाने म्हटले आहे.

करीना कपूरच्या “कभी खुशी कभी गम’ मधील तिच्या ‘पू’ या कॅरेक्‍टरने सारा अली खान खूप प्रभावित झाली होती. सारा जेव्हा लहान होती तेव्हा तिने करिनाला पहिल्यांदा “पू’ च्या रूपातच पाहिले आहे. साराने सांगितले की, सुरुवातीपासूनच आमच्यात सगळ्या गोष्टी स्पष्ट होत्या. आमच्या मनात कोणत्याही नात्याबद्दल गोंधळ नाही. करीनाने साराला सांगितले होते की, तुझी आई खूप चांगली आहे. आम्ही कायमच चांगल्या मैत्रिणी राहिल्या आहोत. त्यामुळे करीनाला असे वाटते की, साराने तिला करीना अशीच हाक मारावी.

करीना कपूर ही सैफची दुसरी पत्नी. तिच्यासोबत विवाहबद्ध होण्याच्याच दिवशी सैफने आपल्या पहिल्या पत्नीला म्हणजेच अभिनेत्री अमृता सिंग हिला एक पत्र लिहिले होतं. सैफने या पत्रात अमृताला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. इतकेच नव्हे तर, त्याने लिहिलेले हे पत्र खुद्द करीनानेही वाचले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)