सारसबाग चौपाटीत थरार ; तरुणावर तलवारीने वार

पुणे – सारसबाग चौपाटी येथे एका पावभाजी सेंटरमध्ये तरुणावर कोयता, तलवार व गजाने वार करण्यात आले. ही घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी अकरा जणांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विकास कांबळे(18,रा.लोहीयानगर) हा त्याचे मित्र करण पवार, यश लोंढे, नरेश कांबले, राहुल खवळे यांच्यासह सारसबाग चौपाटीतील प्रीती पावभाजी सेंटर येथे पावभाजी खात बसला होता.

यावेळी पुर्व वैमनस्यातून अकरा जणांच्या टोळक्‍याने त्याच्यावर कोयता, तलावर व गज अशा हत्याराने वार केले. तर केदार शिंदे याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्‍यात पालघनने वार केले. हा वार फिर्यादीने हातावर घेतल्याने पुढील अनर्थ टळला. हमल्याच्या वेळी फिर्यादीचे मित्र मात्र घटनास्थळावरुन पळून गेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अे.के. चाऊस तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)