“सारथी’च्या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन फरक

पिंपरी – महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनसाठी ठेकेदारी पद्धतीने नियुक्त केलेल्या दहा “कॉल ऑपरेटर’ यांना आता अर्धकुशल कामगार म्हणून वेतन मिळणार आहे. त्यांना पूर्वी दिले जाणारे 16 हजार रूपये वेतन आता 23 हजारांवर पोहोचले आहे. याशिवाय या कामगारांना 1 जूनपासूनचा फरकही मिळणार आहे.

महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनसाठी कॉल ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत. टेक नाईन सर्व्हिसेस यांच्याकडून दर महा प्रतिव्यक्ती 16 हजार 164 अधिक कर यानुसार 10 जून 2018 पासून एक वर्षासाठी एकूण 10 कॉल ऑपरेटर पुरविण्यात आले आहेत. महापालिकेच्या विविध विभागामार्फत ठेकेदारी पद्धतीने कामगार नेमले जातात. ठेकेदारी पद्धतीने नेमलेल्या या कामगारांना आणि ठेकेदारी पद्धतीने दिलेल्या कामावरील कामगारांना विविध कामगार कायदे लागू होतात. महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाकडून कामगार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत वेळोवेळी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, टेक नाईन सर्व्हिसेस यांनाही कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत कळविण्यात आले होते. या पत्रानुसार, टेक नाईन यांनी सुधारीत किमान वेतन दराप्रमाणे वेतन देण्याची विनंती केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कामगार कल्याण विभागाकडील परिपत्रकाअन्वये प्रिन्सीपल एम्प्लॉयर म्हणून कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिसुचनेनुसार कामगारांच्या कामकाजाप्रमाणे व्याख्या ठरवून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सारथी हेल्पलाईनसाठी नेमलेले कॉल ऑपरेटर कर्मचारी हे अर्धकुशल कामगार या संज्ञेत येतात. राज्यात लागू असलेल्या किमान वेतन कायद्यातील तरतुदीनुसार अर्धकुशल कामगारांना 23 हजार 255 रूपये अधिक कर इतके किमान वेतन देणे आवश्‍यक आहे. सद्यस्थितीत सारथी हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेल्या कॉल ऑपरेटर यांना दर महा प्रति व्यक्ती 16 हजार 164 रूपये अधिक कर इतकी रक्कम देण्यात येत आहे. 1 जून 2018 पासून लागू झालेले सुधारीत किमान वेतन दर लागू करायचे झाल्यास दरमहा प्रतिव्यक्ती 7 हजार 91 रूपये यानुसार 12 महिने कालावधीची 10 कर्मचाऱ्यांकरिता 8 लाख 50 हजार रूपये अधिक कर इतकी फरकाची रक्कम द्यावी लागणार आहे. हा विषय स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)