सायब…डोळ्यांसमोर घर जळलं हो…

सहा महिन्यांवर आले मुलाचे लग्न : घरातील पैसे, दागिने जळून खाक

पुणे – “कुटुंबासाठी मोलमजुरी करुन कमावलेली संपत्ती डोळ्यांसमोर खाक झाली. कपड्यांशिवाय काहीच शिल्लक नसून संसारच उघड्यावर पडला आहे. यातच मुलाच्या लग्नासाठी जमावलेला पैसा, दागीने, साहित्य सारेच जळून खाक झाल्याने आता काही शिल्लकच राहीले नाही,’ अशी व्यथा घर खाक झालेल्या छाया नेटावटे यांनी मांडली.

-Ads-

बुधवारी लागलेल्या आगीत नेटावटे यांचे घर पूर्णतः खाक झाले. आगीला सुरूवात झाली, त्याशेजारीच नेटावटे यांचे लहानसे पत्र्याचे घर होते. यात त्यांच्या कुटुंबीयासह त्या राहत होत्या. त्यांना चार मुले असून यातील साईनाथ या मुलाचे येत्या मेमध्ये लग्न ठरले आहे. लग्नासाठी अहोरात्र कष्ट करुन जमवलेले जमवलेले पैसे आगीत जळून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळी नेहमीप्रमाणे नेटावटे यांची चारही मुले कामासाठी बाहेर पडले होते. यानंतर घरातील कामे आवरुन छाया नेटावटे यादेखील कामासाठी बाहेर पडल्या. घराला आग लागल्याची माहिती समजताच नेटावटे यांनी घराकडे धाव घेतली. मात्र, आगीच्या केंद्रस्थानी घर सापडल्याने घरातील वस्तू बाहेर काढणेही शक्‍य झाले नाही. यामुळे डोळ्यांसमोर घर जळताना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. काही तासांत आग आटोक्‍यात आल्यानंतर त्यांनी घराची परिस्थिती पाहिली असता घराचे पत्रेही जळून खाक झाल्याचे दिसले. ही परिस्थिती पाहताच हताश झालेल्या नेटावटे यांना रडू कोसळले. अशीच परिस्थिती इतर अनेक कुटुंबांची आहे.

…घर जळाल्याचे माहितीच नाही
घरातून सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडलेल्या अनेकांना आपले घर जळाल्याचे माहितीच झाले नाही. अनेकजण कामासाठी बाहेर गेले होते. यातील काही जणांकडे मोबाइल नसल्याने त्यांना याची माहितीही होऊ शकली नाही. मात्र, शेजारच्यांकडून ही माहिती समजताच त्यांनी घराच्या दिशेने धाव घेऊन पाहीले असता, घर जळाल्याचे दिसले. यामुळे अनेकांना रडू कोसळले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)