सायबेरीयातील मॉलला लागलेल्या आगीत 53 जणांचा बळी

मॉस्को – रशियातील उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायबेरीया भागातील एका मॉल मध्ये काल लागलेल्या भीषण आगीत किमान 53 जण होरपळून मरण पावल्याचे वृत्त आहे. अनेक जणांचा तेथील ठावठिकाणा अजून समजू शकलेला नाहीं त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केमेरोव्हो शहरातील विंटरचेरी मॉल मध्ये ही आग लागली. त्यात मल्टिप्लेक्‍स थिएटरही आहे. त्यावेळी अनेक जण तेथे सिनेमा पहात होते त्यांनाही या आगीने वेढले. या आगीत 53 जण ठार झाल्याच्या वृत्ताला सरकारच्या अधिकृत यंत्रणेनेही दुजोरा दिला आहे. या आगीत मॉलचा बराच भाग जळून खाक झाला असून अजून किमान चाळीस जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही. त्यात अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.

आगीमुळे दोन सिनेमागृहांचे छतही कोसळले. काल झालेल्या या घटनेनंतर आजही तेथील आग पुर्णपणे विझलेली नाही. जळालेल्या वास्तुचा ढिगारा उपसण्याचे काम आजही तेथे सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)