सायबर हल्ल्यांची संख्या वाढली 

हल्ले रोखण्यासाठी सरकार व कंपन्यांना सावध राहावे लागणार

नवी दिल्ली  – 2018 च्या पहिल्या सहामाहीत रशिया, अमेरिका, चीन आणि नेदरलॅंड यासारख्या देशांमधून भारतावर 6.95 लाख सायबर हल्ले झाले आहेत. सायबर सुरक्षा कंपनी एफ-सिक्‍योरच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत भारतात बसलेल्या हॅकर्सनीही अनेक देशांमध्ये सायबर हल्ले घडवून आणले आहेत. त्यामुळे कंपन्या आणि सरकारला सावध राहावे लागणार आहे.

-Ads-

एफ-सिक्‍योरचे उपाध्यक्ष लेसजेक तसिम्सकी यांच्यानुसार भारत वेगाने डिजिटायजेशनच्या दिशेने वाटचाल करत आहे. याच कारणामुळे जगभरात बसलेले सायबर गुन्हेगार भारताला सायबर हल्ल्यांसाठी लक्ष्य
करत आहेत.

ऑस्ट्रिया, नेदरलॅंड, ब्रिटन, जपान आणि युक्रेन या देशांना भारतीय हॅकर्सचा फटका बसला आहे. परंतु भारतातून होणाऱ्या सायबर हल्ल्यांची एकूण संख्या तुलनेत कमी म्हणजेच 73,482 इतकी राहिली आहे. भारतीय सर्व्हर्सवर सर्वाधिक सायबर हल्ले रशियामधून झाले आहेत. अमेरिका, चीन, नेदरलॅंड आणि जर्मनी येथूनही सायबर हल्ले झाले आहेत.

या पाच देशांमधूनच भारतावर 4.36 लाख सायबर हल्ले झाले आहेत. 2018 च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी-जून) भारतातील एकूण सायबर हल्ल्यांची संख्या 6 लाख 95 हजार राहिली आहे. सायबर हल्ल्यांना तोंड देणाऱ्या देशांच्या यादीत भारत 21 व्या स्थानावर राहिला आहे. दुसरीकडे भारतात बसलेल्या हॅकर्सनी सर्वाधिक 12,540 सायबर हल्ले ऑस्ट्रियाच्या संस्थांवर केले आहेत. यानंतर नेदरलॅंडवर 9,267, ब्रिटनवर 6,347, जपानवर 4,701 आणि युक्रेनवर 3,708 सायबर हल्ले करण्यात आले. या दृष्टिकोनातून सायबर हल्ल्यांची सुरुवात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत 13 व्या स्थानावर राहिला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)