सायबर सेलमध्ये तरूणांचा गोंधळ ः दोघांवर गुन्हा दाखल

सायबर सेलमध्ये तरूणांचा गोंधळ ः दोघांवर गुन्हा दाखल
पुणे, दि. 21 – ओएलएक्‍सवर झालेल्या फसवणूकीचा तपास लागला नाही, म्हणून दोन विद्यार्थ्यांनी सायबर क्राईम सेलमध्ये गोंधळ घातला. या दोघांविरूद्धही बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ओशिन सिंग रामा (23, रा. कोथरुड) व विरेल दिगेश वारा (24, रा. धनकवडी), अशी दोघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई अनुप पंडीत यांनी फिर्याद दिली आहे. ओशिन व विरेल यांची ओएलएक्‍सवरून फसवणूक झाली होती. याप्रकरणी त्यांनी सायबर क्राईम सेलकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने सायबर सेलचे एक पथक राजस्थान येथेही गेले होते. तेथे इतर गुन्ह्यातील दोन आरोपींचा शोध लागला. मात्र, तक्रारदारासंबंधी आरोपी सापडले नाहीत. याचा जाब विचारण्यासाठी दोघेही गुरूवारी सायबर क्राईम सेलच्या कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी तक्रार अर्जाचे काय झाले, अशी विचारणा करत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पी. एच. स्वामी यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)