सायबर सुरक्षेसाठी जागरुकता महत्त्वाची

भगिनी निवेदिता सहकारी बॅंकेतर्फे सायबर सुरक्षा, जागरूकता प्रशिक्षण

पुणे – सध्याच्या काळात सायबर धोके वाढत असून आपल्या हातातील मोबाइलमध्येसुध्दा दुसरा व्यक्ती हस्तक्षेप करू शकतो. यापासून काळजी घेण्यासाठी आपली प्राथमिक माहिती कोणालाही न सांगता जागरुक राहणे गरजेचे आहे, असे मत सायबर गुन्हे अन्वेषक संदीप गडिया यांनी व्यक्त केले.

भगिनी निवेदिता सहकारी बॅंकेतर्फे बॅंकेच्या पदाधिकारी व सभासदांसाठी सायबर सुरक्षा व जागरूकता या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडिया बोलत होते. याप्रसंगी बॅंकेच्या अध्यक्षा जयश्री कुरुंदवाडकर, उपाध्यक्षा रेवती पैठणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे आदींसह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यावेळी गडिया यांच्याबरोबरच सायबर विषयक वकिल राजस पिंगळे यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गडिया म्हणाले, आज सायबर धोके हे डोके वर काढत आहेत. सामान्य माणसाला यामध्ये सहज गोवले जाते. परंतु यापासून बचावासाठी आपली प्राथमिक माहिती लपवली जावी. तसेच कुठल्याही अनोळखी मॅसेजला रिप्लाय न देता आपला पासवर्ड, अकाऊंट नंबर कोणालाही सांगू नये. यावेळी उपस्थित सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांना देखील गडिया यांनी उत्तरे दिली. बॅंकेच्या रेवती पैठणकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)