सायबर सुरक्षेवर भाष्य करणारा देखावा नवे पर्व… सावध रहा सर्व

पुणे  – सोशल मीडीयाच्या अतीवापरामुळे होणारे दुष्परिणाम…सोशल मीडीयावरील अनोळखी असुरक्षित मैत्री…कार्डचा पासवर्ऱ्ड हॅक करुन होणारी फसवणूक…भारतावर तसेच जगावर होणारे सायबर हल्ले या ज्वलंत विषयावर भाष्य करीत तंत्रज्ञानाच्या युगात राहताना कशी काळजी घ्यावी, हे सांगत नवे पर्व, सावध रहा सर्व… असा सायबर साक्षरतेचा संदेश साईनाथ मंडळ ट्रस्टने यंदाच्या देखाव्यातून दिला आहे.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टने यंदा सायबर क्राईम हा विषय घेऊन हा जिवंत देखावा सादर केला आहे. या जिवंत देखाव्याचे लेखन, निर्मिती आणि संकल्पना मंडळाचे अध्यक्ष पीयुष शहा यांची आहे. यामध्ये अर्पिता बनकर, मयुरेश वनारसे, अक्षय भोई, प्रसन्ना केरुर, अथिरा नायर, प्रशांत होले, जया ठाकूर, ओंकार मोहिते या कलाकारांनी काम केले आहे. अमित दासानी, संकेत निंबाळकर, अमर हिरेशिखर, प्रविण वालवडेकर, शंकर निंबाळकर, नरेंद्र व्यास यांनीही याकरीता विशेष परिश्रम घेतले आहेत.
पीयुष शहा म्हणाले,सायबर सुरक्षा हा आजच्या काळातील अतिशय गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा, आणि योग्य वापर न केल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतील हे जीवंत देखाव्यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळातर्फे दरवर्षी प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात येतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)