सायबर गुन्हा न्यायालयात सिध्द करण्याचे पोलिसांपुढे आव्हान

येथील सत्र न्यायालयात सायबरनुसार अद्याप एकालाही शिक्षा नाही 


सायबर गुन्ह्यांसाठी एक जागतिक कायदा आवश्‍यक

विजयकुमार कुलकर्णी
पुणे – राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आर्थिक फसवणूकीबरोबरच बदनामीच्या घटनांचा समावेश सायबर गुन्ह्मयांमध्ये होत आहे. सायबर गुन्हयांची व्याप्ती लक्षात घेता पोलिसांनी गुन्हे शाखेअंतर्गत “सायबर सेल’ची स्थापना केली आहे. मात्र, प्रशिक्षीत कर्मचारी नसल्याने सायबर गुन्हे सिध्द करण्यासाठी आवश्‍यकते ते पुरावे गोळा होत नाहीत. सायबर गुन्हयांची पोलिसांकडून दखल घेऊन गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, या गुन्हयातील आरोपी अनेकदा परदेशातील अज्ञात व्यक्ती किंवा परराज्यातील अज्ञात व्यक्ती असतात. त्यांचा माग काढणे पोलिसांना सहजासहजी शक्‍य नसते. त्यामुळे गुन्हा दाखल झाला तरी तो न्यायालयात सिध्दकरण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. पुणे शहराचा विचार करता पुणे सत्र न्यायालयात सायबर गुन्हयाअंतर्गत अद्याप एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही.
मागील काही वर्षांत अनेक सायबरचे गुन्हे उघडकीस येत आहेत. एटीएम पासवर्ड हॅक करून पैसे काढणे, बनावट क्रेडिट कार्डचा व्यवहारात वापरणे, नायजेरीयन फ्रॉड, फिशिंग, ऑनलाईन खरेदीच्या नावाखाली फसवणूक, दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर सोशल नेटवर्किंग साईटवर खाते उघडून बदनामी करणे, इंटरनेट फेक कॉल्सद्वारे सायबर क्राईम केले जातात. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांचे वेगळे सेल निर्माण केले आहे. विशेष म्हणजे असे गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतुद केली आहे. असे गुन्हे करणाऱ्यांना सहा वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. जरी इतक्‍या कठोर शिक्षेची तरतुद केली असली तरीही अशा गुन्ह्यांचा शोध घेणे पोलिसांसमोरच आव्हान ठरत आहे. बऱ्याच घटनांमागचा सूत्रधार परदेशात असतो. तर काही वेळेला राज्याबाहेर याचे सूत्रधार असतात. प्रत्येक देशाचे सायबर बाबत असलेले कायदे वेगळे आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यात परदेशात जावून शोध घेणे शक्‍य होत नाही. त्यामुळे सायबरबाबत एकच जागतिक कायदा निर्माण करण्याची आता गरज भासू लागली आहे. देशातही अन्य राज्यात जावून तपास करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळेला पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचतात. त्यांना अटकही करतात. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 420 (फसवणूक) नुसार गुन्हा सिध्द होतो. मात्र, सबळ पुराव्याअभावी सायबर कायद्यानुसार गुन्हा सिध्द करण्यास पोलिसांना अपयश येथे. त्याचाच फायदा गुन्हेगारांना होत असतो. त्यामुळे ते सायबर गुन्ह्यातून निर्दोष सुटतात. या पार्श्‍वभूमीवर सायबर नुसार गुन्हेगारांना कधी शिक्षा होणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)