हैदराबाद – सायबराबादमधील पोलिसांनी शनिवारी मल्टी लेव्हल मार्केटिंगचे एक रॅकेट उघड केले. या रॅकेटमध्ये 1,200 कोटी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. सायबराबादच्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विषयक शाखेने 200 कोटी रुपये जप्तही केले आहेत, असे पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मल्टी लेव्हल मार्केटिंगचे 1,200 कोटी रुपये बनावट योजनांमध्ये फिरवण्यात येत होते. त्यामुळे 1,200 कोटींचा गैरव्यवहार उघड झाला आहे, असे पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणातील दोघेजण हरियाणात मुख्यालय असलेल्या कंपनीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होते. हे दोघे मिळून दुहेरी योजना राबवत असत/ यामध्ये एका व्यक्‍तीला अन्य दोघांना योजनेत समाविष्ट करायचे असायचे.

अशारितीने ही साखळी पुढे सुरूच रहायची. यातील सहभागी व्यक्‍तींना कमिशन आणि अन्य लाभांचे प्रलोभन दाखवले जात असायचे, मात्र त्यांची फसवणूकच करण्यात आली. बक्षिसांच्या प्रलोभनाने फसव्या योजना विरोधी कायद्यांतर्गत या दोघांवर कारवाई अशा योजनांमध्ये केवळ सहभागी होणे हा देखील गुन्हा आहे. त्यांच्यावर कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)