सायपद्वारे पाणी चोरीबाबत लोकप्रतिनिधींची चुपी

भवानीनगर- इंदापूर तालुक्‍यातील तळे भरले जात नाही, तरी ती भरण्यात यावी अशी मागणी कायमच नेते मंडळी करतात मात्र, नीरा डाव्या कालव्यावर राजरोसपणे शेतकरी बेकायदेशीर सायपनद्वारे पाण्याची चोरी करीत असेल, तर तलावात पाणी जाणार कोठून व तलाव कसे भरणार? याबाबत लोकप्रतिनिधी बोलत नसून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी यास सर्वस्वी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरतात. तर लोकप्रतिनिधी केवळ व्होट बॅंक सांभाळण्याचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी बारामती व इंदापूर तालुक्‍यात येण्याच्या आगोदर नीरा डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. तब्बल अडीच महिने झाले, तरीही इंदापूर तालुक्‍यातील पाण्याचा तलाव भरलेला नाही. नीरा डाव्या कालव्याला पाणी येताच कितेक शेतकरी बिनधास्तपणे कालव्यावर सायपन टाकून चोरून पाणी नेत आहेत. हे पाणी नेत असताना कालव्याच्या अगदीवरून पाइप सहज दिसेल अशा पद्धतीने हे पाणी चोरून नेले जाते. मग सर्वसामान्य नागरिकालाही पाइप दिसत असेल, तर पाटबंधारे विभागातील काम करणारे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना हे पाइप कसे दिसत नाही याच्या मागे काय दडलय हे समजण्या इतपत जनता दुधखुळी राहिलेली नाही.
पावसाळा जवळपास संपला असूनही अद्यापही बारामती व इंदापूर तालुक्‍यात जोराचा पाऊस पडलेला नाही. पाण्याविना शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्यातच इंदापूर तालुक्‍यातील तलाव कोरडे ठाक पडले असून ते भरणे ही तेवढच महत्त्वचे आहे; परंतु नीरा डाव्या कालव्याला अडीच महिने पाणी आले असतानाही अद्यापही तलाव भालेले नाही. तर या कालव्याचे पाणीही तालुक्‍यात शेवटपर्यंत अगदी थोड्या प्रमाणात पोहोचत असल्या मागचे कारण हे बेकायदेशीरपणे सायपनद्वारे चोरले जाणारे पाणीच आहे.
नीरा डाव्या कालव्यावर सर्रासपणे सायपनने पाणी चोरून नेले जात आहे. मात्र, पाटबंधारे विभागातील अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. नीरा डाव्या कालव्या लगत काही शेतकऱ्यांनी विहिरी खोदण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्यांची लाखो रुपयांना जागा खरेदी केलेली आहे व तेथून ते पाणी 10 ते 20 कि.मी. अंतरावर नेलेले आहे. त्यामुळे त्यांना पाण्याची कायम जादा गरज असते म्हणून अशा बेकायदेशीरप्रकारे पाणी चोरी करून घेतले जात आहे. जर असे पाणी नीरा डाव्या कालव्याच्या बाजूने सगळीकडे घेतले जात असेल तर इंदापूर तालुक्‍याचा तलाव कायमच कोरडा राहणार यात तिळमात्र शंका नाही.

  • सायपद्वारे पाणी चोरी करणाऱ्या 60 शेतकऱ्यांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सायपचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा अपुरी पडत आहे. तसेच सायपन उकरून टाकण्यासाठी वेळोवेळी जेसीबीची गरज पडते मात्र, त्या जेसीबीचा खर्च कोणाकडून वसूल करावया हा एक प्रश्‍नच आहे,
    – आर. पी. शेंडकर, शाखा अधिकारी, पाटबंधारे विभाग, सणसर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)