सायन्स पार्कमध्ये “फटाके व दुष्परिणाम’वर व्याख्यान

पिंपरी –पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व मराठी विज्ञान परीषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथील सभागृहात शनिवारी (दि.3) सायंकाळी साडेपाच वाजता विज्ञान व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मराठी विज्ञान परिषद पुणेचे कार्याध्यक्ष विनय र. र. हे “फटाके व आरोग्यावरील दुष्परिणाम’ विषयावर व्याख्यान देणार आहेत, अशी माहिती सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी मदनमोहन साळवे यांनी दिली.
या व्याख्यानादरम्यान फटाक्‍यांचा आरोग्यावर होणाऱ्या दुष्परीणामांबाबत माहीती देण्यात येणार असून काय खबरदारी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व्याख्यानानंतर सायंकाळी साडेसहा वाजता पिंपरी चिंचवड महापालिका प्रोत्साहित संगीत संध्या कार्यक्रम होणार असून याअंतर्गत पुण्याचे कुणाल वाईकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)