सायना, सिंधू आणि श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात 

फ्रेंच ओपन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा 
पॅरिस – येथे सुरु असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे स्टार खेळाडू सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आणि किदंबी श्रीकांतयांचे स्पर्धेतील आव्हान उपान्त्यपूर्व फेरीत संपुष्टात आल्याने भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात तिसरे मानांकन असणाऱ्या पी.व्ही.सिंधूचा सातवे मानांकन असलेल्या चीनच्या हे बिंगजिआओ कडून सरळसेट मध्ये पराभव झाला. तर, श्रीकांतचा जापानच्या अग्रमानांकीत मोमोटाने 16-21, 19-21 असा संघर्षपूर्न पराभव करत त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. तर, सायना नेहवाल पुन्हा एकदा चाईनेज तैपेइच्या ताई त्झु यिंगकडून पराभुत झाली आहे. या अव्वल तिन्ही खेळाडूंचा उपान्त्यपूर्व फेरीत पराभव झाल्याने भारतीय बॅडमिंटन संघाचे एकेरितील आव्हान संपुष्टात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण मिळवता न आल्यामुळे सिंधूला हे बिंगजियाओ हिच्याकडून 13-21, 16-21 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. सिंधूचा हा बिंगजियाओविरुद्धचा या वर्षांतील सलग दुसरा पराभव ठरला आहे. याआधी जुलै महिन्यात इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बिंगजियाओने सिंधूवर सरळ सेट मध्येच मात केली होती. या विजयासह बिंगजियाओने सिंधूविरुद्धची कामगिरी 7 विरुद्ध 5 अशी सुधारली आहे.

दरम्यान, सायना नेहवाल ही देखिल चायनीज तैपेईच्या अव्वल मानांकित ताय झू यिंग कडून सहज पराभुत झाली. सायनाला उपांत्यपूर्व फेरीत 20-22, 11-21 अशा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

तर, किदंबी श्रीकांतने जपानच्या केंटो मोमोटाविरुद्ध कडवी झुंज दिली, पण त्याचे आव्हान 16-21, 19-21 असे संपुष्टात आले. मोमोटाविरुद्धचा श्रीकांतचा हा या वर्षांतील सातवा आणि सलग पाचवा पराभव ठरला. भारताच्या सर्व खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले असताना सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या बिगरमानांकित जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत मजल मारली, ही भारतासाठी जमेची बाजू ठरली. या दोघांनी भारताच्याच मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांच्यावर 21-17, 21-11 अशी मात केली. मात्र अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी त्यांना इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित मार्कस गिडेऑन आणि केव्हिन सुकामुल्जो यांच्याशी लढत द्यावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)