सायना नेहवालची जागतिक बॅडमिंटन रॅंकिंगमध्ये घसरण

नवी दिल्ली: लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदकाची कमाई करणाऱ्या सायना नेहवालची जागतिक बॅडमिंटन रॅंकिंगमध्ये घसरण झाली आहे. अलीकडेच चीन, नानजिंग येथे पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत सायनाला कॅरोलिना मरिनकडून सहज पराभव पत्करावा लागला होता.
यामुळे ती अव्वल दहातून बाहेर पडली असून ती आता 11व्या क्रमांकावर घसरली आहे. तर जागतिक स्पर्धेत उपविजेती ठरलेली सिंधू तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तैपईच्या ताय झ्यू यिंगने अव्वल क्रमांक कायम राखला असून दुसऱ्या क्रमांकावर जपानची अकेन यामागुची आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)