सायनावर ताई जु यिंगची मात 

इंडोनशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 
जकार्ता, दि. 28 – इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला तिची जुनी प्रतिस्पर्धी आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ताई जु यिंगकडून सातव्यांदा पराभव झाल्याने स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. सांधाच्या दुखापतीतून सावल्यानंतर एका वर्षानी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम सामन्यात सायनावर अवघ्या 27 मिनीटांत 9-21, 13-21 अशी एकतर्फी मात करत यिंगने विजेतेपद पटकाविले.
ताई जु यिंगने माजी अग्रमानांकित भारतीय बॅडमिंटनपटू सायनावर दहा सामन्यात नवव्यांदा विजय मिळविला. सायनाने 2011मध्ये प्रारंभी तैवानच्या बॅडमिंटनपटूंवर विजय मिळविला होता. मात्र, त्यानंतर 2013मध्ये स्वीस ओपनमध्ये एकमात्र विजय मिळविता आला.
स्पर्धेतील अंतिम सामन्यात विश्‍वक्रमवारीत 12व्या क्रमांकावर असलेल्या सायनाकडे ताई जु यिंगच्या फटक्‍यांचे कोणतेही प्रत्युत्तर नव्हते. यिंगने चपळता आणि शानदार रिटर्न मारत सामन्यावर वर्चस्व राखले. तसेच सायनानेही अनेक चुका केल्या.
यिंगने सुरूवातीपासूनच फार्म कायम राखत 10-2 अशी मोठी आघाडी घेतली. त्यानंतर सायनाने 1 गुण मिळविला, परंतु ब्रेकपूर्वी 11-3 अशी पिछाडीवर होती. सायनाने वापसी करण्याचा प्रयत्न केला. 7-12 असा गुणफरक असताना दोन्ही खेळाडूंमध्ये 43 शॉटची दिर्घ रॅली चालली. सायनाने बाहेर फटका मारल्याने ही रॅली संपुष्टात आली. त्यानंतर व्हिडिओ रेफरलमध्ये तिने आणखी एक गुण गमविला. अखेर यिंगने पहिला सेट सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही ताई जु हिने दबदबा कायम राखत 4-0 अशी आघाडी घेतली. तिने आपल्या खेळावर नियंत्रण ठेवत सायनाला कोणतीही संधी न देता 21-13 असा सेट जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)