सायनाने पटकावले सुवर्ण, सिंधुला रौप्यवर मानावे लागले समाधान

गोल्ड कोस्ट – राष्ट्रकुल बॅडमिंटन महिला एकेरिच्या अंतिम लढतीत सायना नेहवालने पी.व्ही सिंधूवर मात करत सुवर्ण पदक पटकावले. दोन गेम जिंकून सायनाने सिंधूवर सहज मात केली. महिला एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये भारताच्या या दोन्ही बॅडमिंटनपटू आमनेसामने आल्या होत्या. अंतिम लढतीमध्ये सायनाने 21-18 आणि 23-21 असा सिंधूचा पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावले. या पराभवामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या विजयामुळे सायनाने पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)