सायगावात चिमुकल्यांकडून विठुनामाचा गजर

चिंबळी-सायगाव (ता. खेड) येथील सिद्धेश्वर इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्ताने विठ्ठल नामाचा गजर करत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असे स्लोगन बोलून वृक्षसंवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीतून दिला असल्याची माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता बोरकर यांनी दिली.
झाडे लावा, झाडे जगवा, बेटी वचाव, अशा व संतांची शिकवणींची घोषणा देत गावातून चिमुकल्यांनी प्रभात फेरी काढली. यावेळी मुलींनी घागरी, कलश घेऊन, छोटे तुलसी वृंदावन डोईवर घेऊन मुलांनी पालखी खांद्यावर घेत फेरी मारण्यात आली. वारकरी पेहराव करून हातात पताका धरून गावातून संस्काराच्या घोषणा देत फेरी मारण्यात आल्या. तर मुलींनी नऊवारी नेसून गावकऱ्यांना मोलाचा संदेश दिला. गावातील पांडुरंगाचे दर्शन घेत प्रभातफेरी परतली. यासाठी पूनम बोरकर, उर्मिला बोरकर, योगेश करवंदे आदिंनी परीश्रम घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक शिवाजी बोरकर, संदेश सोपान बोरकर, गावातील महिलांनी पालखीचे दर्शन घेवून चिमुकल्यांचे कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)