सायक्‍लोथॉन स्पर्धेचे येत्या रविवारी आयोजन

जायंट स्टारकेन आणि रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी यांचा संयुक्‍त उपक्रम

पुणे – प्रदूषणाचे होणाऱ्या घातक परिणामांवषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांमध्ये प्रदूषणविरहित आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने स्टारकेन स्पोर्टस प्रा. लि आणि रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी यांनी रविवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी सायक्‍लोथॉनचे आयोजन केले आहे.

ही सायकल रॅली सकाळी 7 वाजता निघणार असून प्राधिकरण येथील मेयर हाउस प्लॉट येथून निघून पिंपरी चिंचवड मधील बहुतांश भागातून जाणार आहे. हे सायक्‍लोथॉन फुल (30 किमी), हाफ (15 किमी) आणि लहान मुले (5 किमी) या 3 विभागांमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या वायूप्रदूषणाबद्दल नागरिकांना सतर्क करणे आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.

वाढत्या वायूप्रदूषणामुळे कॅन्सर, अस्थमा, त्वचा रोग यांसारखे कितीतरी विकार होऊ शकतात. ही सायक्‍लोथॉन वाहनांचा वापर कमी करून वायूप्रदूषण कमी करण्यास मदत करणे आणि दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करणे याविषयीचा संदेश देईल. रोटरी क्‍लब ऑफ पिंपरीने खेड तालुक्‍यातील खारपूड आणि खोपेवाडी ही दोन गावे दत्तक घेतली असून गावातील लोकांचे एकूण आयुष्यमान सुधारणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास रोटरी क्‍लब त्यांना मदत करत आहे. या सायक्‍लोथॉनद्वारे रोटरी क्‍लब कॉर्पोरेट क्षेत्राला सहभागी करून घेऊन निधी उभा करण्याचादेखील प्रयत्न करत आहे, जेणेकरून जमा झालेला निधी हा या गावातील लोकांच्या कल्याणाकरता वापरता येईल.

या प्रसंगी बोलताना स्टारकेन स्पोर्टसचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पाटील म्हणाले की, जायंट स्टारकेनतर्फे आम्ही नेहमीच पर्यावरणाशी निगडीत समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि सायकलिंग हे त्यासाठी किती योग्य माध्यम आहे हा प्रसार करत असतो. मला आज रोटरी क्‍लब सोबत या सायक्‍लोथॉनसाठी भागीदारी करताना अत्यंत आनंद होत आहे.

पिंपरी चिंचवडचा अतिशय वेगाने विकास होत असून शहरात विविध वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि वायूप्रदूषण वाढत आहे. या काळात प्रदूषण, वाढती रहदारी यावर मात करण्यासाठी सायकलसारख्या उपयुक्‍त वाहनाचा वापर वाढवला पाहिजे. त्याच बरोबर या सायक्‍लोथॉनमुळे रोटरी बरोबर त्यांच्या सामाजिक उपक्रमात देखील आम्हाला सहभागी होता येणार आहे. भविष्यात देखील रोटरी क्‍लबच्या अशा उपक्रमांना आम्ही नेहमीच पाठिंबा देऊ, असेही पाटील यांनी सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)