सायकल योजनेला विद्यापीठातही घरघर

प्रशासनाचे दुर्लक्ष : 375 पैकी फक्‍त 25 सायकल उपलब्ध

पुणे – स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सर्वप्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा गाजावाजा करून सायकल योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार “झूमकार पेडल’च्या 100, तर “ओफो’ कंपनीच्या 275 सायकल विद्यापीठात उपलब्ध करुन देण्यात आल्या. मात्र, प्रशानसाच्या दुर्लक्षामुळे या सायकल गायब झाल्या असून सध्या विद्यापीठ परिसरात अवघ्या 20 ते 25 सायकल उपलब्ध आहेत.

-Ads-

पुणे विद्यापीठ परिसरात प्रदूषण कमी करण्यासाठी पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला “झूमकार पेडल’च्या सहकार्याने 5 डिसेंबर 2017 रोजी विद्यापीठात 100 सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या. याला प्रतिसाद मिळाल्याने “ओफो’ कंपनीच्या आणखी 275 सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, “ओफो’च्या पिवळ्या सायकल्सची यंत्रणा सुरक्षित नसल्याने परिसरातील लोकांनी त्या चोरल्या. यानंतर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनीही विद्यापीठ परिसरातील 25 सायकल गायब असल्याचे कबूल केले होते. यासाठी सायकल फुकट न देता त्यासाठी पैसे आकरण्याची मागणीही त्यांनी महापालिकेकडे केली. मात्र, तरीदेखील सायकल चोरी जाण्याचे प्रमाण कमी झाले नाही. याला कंटाळून शेवटी “ओफो’ कंपनीच्या 275 सायकली स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी टेम्पोमध्ये भरत उचलून नेल्या. तर, यासाठी नेमलेले कर्मचारीही विद्यापीठातून हलविण्यात आले. यामुळे विद्यापीठात केवळ झूमकार कंपनीच्या हिरव्या 100 सायकल शिल्लक होत्या. मात्र, प्रशासन या सायकल्सच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. त्याचबरोबर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने या सायकल्सही विद्यापाठीतून गायब झाल्या आहेत. सध्या फक्‍त 20 ते 25 सायकली विद्यापीठ परिसरात वापरण्यासाठी शिल्लक असल्याचे केलेल्या पाहणी दिसून आले आहे.

जानेवारी-फेब्रुवारीत विद्यापीठ परिसरात ठिकठिकाणी सायकल उपलब्ध होत्या. परिसरात छोटी-मोठी कामे, विभागात जाण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. मात्र, आता सायकल नसल्याने विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. काही ठिकाणचे स्टॅन्डदेखील तुटले असून गेल्या अनेक दिवसांपासून सायकल गायब आहेत. याकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
– नंदकुमार हांगे, विद्यार्थी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)