सायकल बॅंक उपक्रम कौतुकास्पद

नगर- आज समाजामध्ये अनेक कुटूंब अशी आहेत कि ज्यांना मदतीची गरज असते. त्यांची गरज ओळखुन त्यांना मदतीचा हात दिला तर ते नक्कीच संकटांवर मात करु शकतात. आज नगरशहरात अनुलोम सामाजिक संस्थेच्या संकल्पनेतून सायकल बॅंक उपक्रम सुरु करुन समाजातील गरीब व गरजुंना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गरीब व गरजुंना मदतची हात मिळणार आहे. आज नगरमध्ये सायकल बॅंक माध्यमातुन जी मदत होत आहे,ती कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राजाभाऊ मुळे यांनी केले.

अनुलोम सामाजिक संस्था व पद्मशाली युवाशक्ती यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त 5 गरजु व गरीब शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संपर्क प्रमुख राजाभाऊ मुळे यांच्या हस्ते सायकल देण्यात आले. याप्रसंगी रा.स्व.संघ शहर संघचालक शांतीबाई चंदे, निलेश लोढा, विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद क्‍यादर, पद्मशाली ज्ञाती समाज अध्यक्ष संजय वलाकट्टी, बाळकृष्ण सिद्दम, अरविंद चन्ना, पेद्राम, रमेश बोगा, सागर बोगा, अजय म्याना, विनोद बोगा, किरण वल्लाकटी, रवि दंडी, दिपक बुरला, दिपक गुंडू, शंकर जिंदम, अमित बिल्ला, प्रविण शिरापुरी, योगेश म्याकल, सुदाम कोंडा, श्रीनिवास इपलपेल्ली आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना राजाभाऊ मुळे म्हणाले कि, समाजातील नागरीकांनी आपल्याकडील जे अधिक आहे ते समाजातील वंचित घटकांना दिले पाहिजे. त्यातुनच सेवाभाव निर्माण होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)