सायकलसाठी वाचवलेले पैसे ‘तिने’ केरळच्या मदतीसाठी दिले…

विल्लुपुरम (तामिळनाडू): केरळमधील भीषण पूरामुळे हजारो जणांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून केरळवासियांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अशातच तामिळनाडूतील एका लहानग्या मुलीने स्वतःच्या दातृत्वाने सगळ्यांना आचंबित केले आहे. नवी सायकल घेण्यासाठी तिने जमवलेले 9 हजार रुपये केरळवासियांच्या मदतीसाठी देणगी म्हणून दिले आहेत. हे 9 हजार रुपये जमवण्यासाठी गेल्या 4 वर्षांपासून ती बचत करत होती. टिव्हीवर केरळमधील भीषण पूराची दृश्‍ये बघून तिने हा निर्णय घेतला. अनुप्रिया असे या लहानग्या मुलीचे नाव आहे. टिव्हीवर पूराचे थैमान बघून मी साठवलेले पैसे मदतनिधीला देणार आहे, असे अनुप्रियाने पत्रकारांना सांगितले.

तिच्या या कृतीने सगळेच जण हेलावून गेले. तिच्या या दातृत्वाने प्रभावित होऊन हिरो सायकल कंपनीने तिला नवी सायकल भेट देण्याचे वचन दिले आहे. कंपनीच्या ट्‌विटर अकाउंटवरून अनुप्रियाचे कौतुकही करण्यात आले आहे. तिला नवी सायकल दिली जाईल, यासाठी तिने आपला पत्ता ई मेल ने कळवावा असे हिरो मोटर्स कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज एम मुंजाल यांनी म्हटले आहे. अनुप्रियाला दरवर्षी नवी बाईक देण्याची तयारीही त्यांनी या प्रतिक्रियेमध्ये दर्शवली आहे. कॉंग्रेसचे केरळमधील खासदार शशी थरूर यांनीही कंपनीच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)