सामूहिक बलात्कार प्रकरणी सीबीएसईने ‘या’ शाळेची मान्यता घेतली काढून  

देहराधुन: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने डेहराधुन येथील नामांकीत मानल्या जाणाऱ्या ‘जीआरडी वर्ल्ड स्कुल’ या शाळेची मान्यता काढून घेतली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की सदर शाळेमधील चार विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार केला असल्याचा आरोप असून, हा गुन्हा दडपण्याचा ठपका शाळेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक व इतर तीन कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी मुख्य शिक्षण अधिकाऱ्याने शाळेला भेट दिल्यानंतर शाळेमध्ये सीसीटीव्ही न लावणे, पुरेसे सुरक्षा कर्मचारी न नेमणे, इत्यादी नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे लक्षात आले. याची सीबीएसईने गंभीर दाखल घेत थेट शाळेची मान्यताच काढून घेतली आहे. या निर्णयाचा शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर मात्र काही परिणाम होणार नसल्याचेही  सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)