सामूहिक अत्याचारप्रकरणी प्रथमच महिलेला शिक्षा

चौघांना 20 वर्षे सक्तमजुरी, विशेष न्यायालयाचा निकाल

पुणे – शाळेला सुट्ट्या असल्याने नातेवाईकांकडे आलेल्या 12 वर्षांची मुलीवर सामूहिक अत्याचारप्रकरणात नात्यातील महिलेसह चौघांना 20 वर्षे सक्तमजुरी न्यायालयाने सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस.के.कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. सामूहिक अत्याचार प्रकरणात राज्यात प्रथमच एखाद्या महिलेला शिक्षा झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनोज सुरेश जाधव (21), वर्षा धनराज गायकवाड (32), अजय दीपक जाधव (22 तिघेही रा. आनंदनगर, मुंढवा) आणि प्रशांत गुरूनाथ गायकवाड (28, रा. रक्षकनगर, खराडी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी वर्षा, प्रशांत या दोघांना प्रत्येकी 5 हजार रुपये, तर मनोज आणि अजय यांना प्रत्येकी 4 हजार रुपये दंडही सुनावण्यात आला आहे. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. याबाबत पीडितेच्या आईने चंदननगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना 13 एप्रिल ते 25 मे 2016 या कालावधीत मुंढवा येथील पिंगळे वस्ती येथे घडली.

पीडित मुलगी नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आली होती. तिला आरोपी वर्षा ही रक्षकनगर येथील आरोपी प्रशांत गायकवाड याच्या फ्लॅटवर घेऊन गेली. त्यावेळी ती प्रशांत याच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास गेली. त्यावेळी तिने आरोपी मनोज जाधव याच्यासह गप्पा मारत तिला बसविले होते. दरम्यान, वर्षाने “मनोज तुला कसा वाटतो, तू त्याच्याशी बोलत जा, त्याच्याबरोबर लग्न कर, शरीर संबंध ठेव. तुला सगळी मदत करेल,’ आश्‍वासन दिले. त्यानंतर वर्षा हिने तिन्ही आरोपींसोबत पीडितेसमोर शरीर संबंध ठेवले होते. 14 मे 2016 रोजी वर्षाने पीडितेला मुंढवा येथील पिंगळे वस्ती येथील सदनिकेत नेले. त्यावेळी वर्षा हिने पीडितेचे तोंड दाबले.

प्रशांत आणि अजयने तिचे हात पाय धरले. त्यानंतर मनोजने तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चंदननगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी मेहर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. यावर सुनावणीवेळी न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) नुसार चौघांना 7 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड, 376 (2) (फ) (नातेवाईक, शिक्षक, विश्‍वासातील व्यक्तींकडून विश्‍वासघात) नुसार वर्षा आणि प्रशांत या दोघांना 10 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 1 हजार रुपये दंड, 376 (डी) (सामूहिक बलात्कार) नुसार चौघांना 20 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 2 हजार रुपये दंड, 34 (संगनमत) नुसार चौघांना 1 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 500 रुपये दंड, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 12 नुसार चौघांना 2 वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

या प्रकरणात “ज्या महिला नातेवाईकांने पीडित मुलीचे संरक्षण करायला हवे, त्याच महिलेने तिच्यासोबत वाईट कृत्य केले आहे. त्यामुळे त्या मुलीला मानसिक धक्का बसला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलेसह चौघांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी,’ अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली होती.

बारा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यामध्ये महिलेसह दोन नातेवाईक आरोपींमध्ये होते. अशा प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून दिल्याने समाधान वाटत आहे.
– राजेश कावेडिया, अतिरिक्त सरकारी वकील

नवीन कायद्यानुसार शिक्षा
पूर्वी सामूहिक अत्याचार प्रकरणात केवळ पुरूषालाच शिक्षा सुनावण्याची तरतूद होती. मात्र, त्यामध्ये 3 फेब्रुवारी 2013 मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार सामूहिक बलात्कार प्रकरणात कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीला शिक्षा होणार आहे. या तरतुदीनुसार ही शिक्षा झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)