संग्रहित छायाचित्र

चंदीगड – सीबीएसई परिक्षेत शाळेत पहिल्या आलेल्या एका 19 वर्षीय मुलीवर हरियानात तीन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्याचा पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून यातील आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

या प्रकरणात तीन आरोपींपैकी एक लष्करी जवान असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथके पाठवण्यात आली आहेत अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक बी. एस. संधु यांनी दिली.

गेल्या बुधवारी तीन जणांनी या मुलीला हरियानाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील एका बसस्टॉपवरून पळवून नेले आणि त्यांनी तिच्यावर एका शेतात अमानुष अत्याचार केले. या घटनेनंतर लष्करी जवान असलेला आरोपी राजस्थानात ड्युटीवर निघून गेला आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.

अन्य दोन आरोपींचाही शोध जारी असून तेही लवकरच सापडतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. या मुलीवर 8 ते 10 लोकांनी बलात्कार केल्याचा आरोप या मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेतील धक्‍क्‍यातून आपली मुलगी अजून सावरलेली नाही असे या मुलीच्या आईने सांगितले. या प्रकरणात पोलिस अत्यंत ढिलाईने तपास करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)